*'कलाब्धि: संस्कृती आणि कलांचा पर्यावरणपूरक महोत्सव'*
व्हर्सटाईल ग्रुप प्रस्तुत विन्स्पायर घेऊन आला आहे संस्कृती आणि कलांचा पर्यावरणपूरक महोत्सव: *'कलाब्धि'* . आपल्या भारतातील समृद्ध परंपरा, कला, कुशल कारागीर आणि कलाकार यांना हक्काचं व्यासपीठ देऊन त्याना प्रोत्साहन देणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.
कुठल्याही कलेचा अस्सलपणा आणि आस्वाद चार भिंतीत कोंडून कधीच घेता येत नाही किंवा बंदिस्त गॅलरीत किंवा संग्रहालयात कलेचा अनुभव घेता येत नाही. उलट खुल्या वातावरणात हि कला जनसामान्यांपर्यंत पोहोचते, फुलते बहरते आणि अधिक टवटवीत होते. कलेचं माहेरघर असणाऱ्या आणि कलासक्त छत्रपती शाहूंच्या करवीर काशीमध्ये , पंचगंगेच्या काठावर साकारणारा कलाब्धि हा असा खुला मंच असेल जिथं कला आणि संस्कृतीचे सामाजिक आयाम अनुभवता येतील.
कल्पना, कला, अभिव्यक्ती, आणि सृजनशीलता या मानवाला लाभलेल्या अमूल्य देणग्या आहेत. जर रंगाची मुक्त उधळण आणि ब्रशचे फटकारे हे तुमच्या सृजनशीलतेचं अचूक माध्यम आहेत, जर तुमच्या वैशिष्ठ्यपूर्ण हस्तकलेचं प्रात्यक्षिक इतरांना मोहित करतं, जर भारतीय इतिहास, परंपरा आणि कला यांचं प्रतिबिंब तुमच्या चित्रांमध्ये व्यक्त होतं तर कलाब्धि आहे तुमच्या हक्काचं भव्य व्यासपीठ जिथं तुमच्या कलेला मिळेल वाव आणि जाणकारांकडून आणि लोकांकडून कौतुकाची थाप!
या महोत्सवाचा मुख्य विषयच आहे भारतीय परंपरा आणि संस्कृती. आपल्या समृद्ध भारतातील अस्सल देशी परंपरा, आपल्या लोकांच्या पूर्वापार चालत आलेल्या खान-पानाच्या, पेहरावाच्या, राहणीमानाच्या विविध पद्धती, विविध भागातील सांस्कृतिक, भौगोलिक, ऐतिहासिक इतकेच काय अध्यात्मिक वारसा हेच असेल आपल्या खऱ्या-खुऱ्या भारतीयत्वाचं खरं खुरं दर्शन .... या महोत्सवाच्या माध्यमातून हा ओतपोत भरलेला परंपरांचा वारसा अधोरेखित करणे, त्याची नव्या पिढीला ओळख करून देणे आणि जे सध्या या कलांचं संवर्धन आणि जातं करत आहेत त्यांना प्रोत्साहन जरूर भेट द्या *'कलाब्धि: संस्कृती आणि कलांचा पर्यावरणपूरक महोत्सव*
*अधिक माहितीसाठी संपर्क:*
*मोबाईल;*
*सहभागासाठी तुम्ही तुमच्या कलेचे काही फोटोज खाली दिलेल्या लिंकवरती पाठवू शकता*
*विन्स्पायर असोसिएशनचे बक्षिस संघटनेसोबत राहील.
English
Versatile’s WInspire introduces ‘Kalabdhi’ – an eco-friendly cultural festival promoting the rich heritage, art and craftsmanship of local artisans and artists.
Art does not stand true in closed-door galleries and museums, but needs to reach the masses and enlighten us of the rich socio-cultural Indian history. Do your brush strokes engage creativity? Do you think you can demonstrate the love for Indian craft, art and historical significance through a pictorial piece? We present to you a platform where your talent is recognised, appreciated and celebrated on a grand scale.
‘Authentic India’/’Quintessential Indian-ness’ – an idea to preserve the essence of being Indian, breathing Indian-ness / preserving the living heritage art for Modern India/ an idea to preserve the essence of the living regional heritage
‘Authentic India’ is a true representation of the cultural, regional, geographical, architectural and even spiritual insights around us. Your artwork is expected to breathe an enriching experience of the legacy – be it the heritage architecture, people, communities, spaces or subjects.
For any inquiries, please get in touch us at winspireevents@gmail.com or call on (phone number).Please upload your artwork at the given link below on or before 7th February, 2024.
WInspire Association prizes will remain with the organization.